डहाणू तालुका कृषि अधिकारी कार्यालयात कृषि संजीवनी कार्यकक्रमास मा. विनयकुमार आवटे साहेब यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

आज दिनांक २९ जून रोजी तालुका कृषि अधिकारी डहाणू कार्यालयात कृषि संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक मा. कृषि सहसंचालक श्री. विनयकुमार आवटे साहेब होते. कृषि विभागाच्या विविध योजनां बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषि क्षेत्राची भावी दिशा , आव्हाने आणि संभाव्य उपाययोजना बाबत माननीय आवटे साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी चिकू विमा हप्ता कमी करण्याबाबत काय करता येईल काय याबाबत विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, सदर विमा कंपनीचा तीन वर्षाचा शासनाशी करार आहे, त्यामुळे आता त्यात बदल होऊ शकत नाही, परंतु नवीन इन्शुरन्स कंपनी आल्यास आणि आपण पाठपुरावा केल्यास होवू शकेल. चिकू पिका वरील किड रोगाच्या नियंत्रणासाठी स्वतः जातीने लक्ष द्यावे असे आवाहन त्यानी केले. पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात सर्वत्र नाचणी, वरई, ज्वारी , बाजरी या पिकांचे मिनिकिट वाटप करण्यात येईल . यामध्ये आपण आपल्या पुरता बियाणे मिनिकिट लागवड करुन क्षेत्र वाढीस मदत करावी आणि स्वतःचे आरोग्य राखणे साठी या पौष्टिक अन्नपदार्थाचा वापर आहारात वाढवावा असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास ३५ शेतकरी उपस्थित होते. यावेळी चिकू उत्पादक संघाचे श्री. यज्ञेश सावे आणि मिलिंद बाफना उपस्थित होते. परिसरातील प्रगतिशील मोठ्या संखेने उपस्थित होते.
तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. रवींद्र पाचपुते साहेब, मंडळ कृषि अधिकारी श्री. अनिल नरगुलवार आणि शनवारसाहेब, जगदीश पाटील तसेच कृषि विभागाचे कर्मचारी कृषि पर्यवेक्षक , सहाय्यक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →