विविध कार्यक्रमांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य दिन साजरा

संपूर्ण राज्यात मकर संक्रात – भोगी हा दिवस पौष्टिक तृण धान्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मा. दशरथ तांभाळे साहेब स्मार्ट प्रकल्प पुणे यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले .तसेच त्यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व कृषि विभागाच्या योजना या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी यावेळी तांभाळे साहेबांचा आदरपूर्वक सत्कार केला. या कार्यकमासाठी गावचे कृषि सहायक कृषि पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले.

पौष्टीक तृणधान्य दिवस उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मौ.अष्टेवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक-श्री निखिल रायकर मंडळ कृषी अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्व,शेतकऱ्यांच्या दृष्टीने पौष्टिक तृणधान्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गदर्शन,प्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,पौष्टिक तृणधान्य दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याबाबत संकल्पना इ बाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमास कृषी सहाय्यक श्री. संदीप रामगुडे ,सरपंच आष्टा, विविध महिला बचतगट प्रतिनिधी, जि. प. शाळेचे शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रयत फाउंडेशन,भूम यांच्याकडून आयोजीत भव्य खुल्या धावण्याच्या स्पर्धेसाठी उद्घाटन व समारोप प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी श्री. निखील रायकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023” तसेच मकर संक्रांत भोगी हा दिवस पौष्टिक दिन म्हणून साजरा करण्याबाबत कल्पना देऊन ‘जनजागृती’ ची संकल्पना समजावून सांगितली. तसेच उपबोधक वाक्यांचा समावेश असणारे पोस्टर्स बनवून उपलब्ध करून दिले. दरम्यान जिल्हा परिषद शिक्षक, अकॅडमी चे कोच, शिक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व इतर मान्यवर यांच्या सह सर्व स्पर्धक व उपस्थिनाना पौष्टिक तृणधान्य चे महत्व सांगितले व आठवड्यातून किमान एकदा पौष्टिक तृणधान्य पदार्थाचे आहारात वापर करण्याचे आवाहन श्री निखिल रायकर,मंडळ कृषी अधिकारी,ईट ता.भूम जि. उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात आले.



शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →