मौजे रामपुर, डहाणू येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य लागवड बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 15/5/2023रोजी मौजे रामपूर येथे शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कृषि विभागाच्या योजनाची सविस्तर माहिती कृषि पर्यवेक्षक श्रीमती विशे मॅडम यांनी दिली तसेच भात बियाण्या ला मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी कशी करावी याबद्दल प्रात्यक्षिक श्री . शरद मुडा कृषि सहाय्यक यांनी करून दाखवले . पौष्टिक तृणधान्य लागवड बाबत माहिती देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्षिकात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री पडवळे साहेब, ग्रामसेवक श्री. निलेश जाधव उपसरपंच सदस्य व 58शेतकरी उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →