मौजे घुणकी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे कार्यक्रम वर्षभर साजरे करण्याविषयी एकमताने ठरविले.

कोल्हापूर जिल्हा तालुका हातकणंगले येथील मौजे घुणकी गावामध्ये ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्री. संतोष पाटील यांनी समजावून सांगितले.
महसूल विभागाचे तलाठी, ग्रामविकास विभागाचे ग्रामविकास अधिकारी, शालेय शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक, आशा वर्कर्स इत्यादींना संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या सन 2023 या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच वर्षभरात वेगवेगळ्या महिन्यांमध्ये पौष्टिक तृणधान्याचे उपलब्धतेनुसार पौष्टिक तृणधान्य महिना साजरे करण्याविषयी एकमताने ठरविण्यात आले. महिला बचत गटामार्फत पाककला स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या कडून निबंध लेखन स्पर्धा, शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिके, ग्रामस्थाकरिता घोषवाक्य स्पर्धा इ. कार्यक्रम वर्षभर साजरे करण्याविषयी एकमताने ठरविले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →