गोळेगणी तालुका पोलादपूर येथे कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य चित्रकला स्पर्धा संपन्न.


पोलादपूर _ आहारातील पोषकतत्व अभावी ग्रामीण व शहरी भागात आजाराचे प्रमाण वाढत असुन फास्ट फूड पासून कुटुंब दूर ठेवून पौष्टिक तृणधान्य आहारात सामवेश‌ करणे काळाची गरज असल्याचे मत कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष राबवत असून महात्मा फुले जयंतीनिमित्त गोळेगणी पंचक्रोशी माध्यमिक हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगणी येथे तालुका कृषी विभागामार्फत चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच गोळेगणी प्रकाश दळवी , उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे, कृषी मित्र नामदेव येरुणकर, ग्रामरोजगार सेवक शेखर येरूणकर, प्रगतशील शेतकरी प्रकाश येरुणकर, युवा शेतकरी प्रसाद पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक विलास उतेकर,पंचक्रोशी माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास जाधव उपस्थित होते
शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याचे आहारामधील महत्व चित्रकलेद्वारे समजावे, आहारात बदल होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य चित्रकला स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
चित्रकला स्पर्धा ही पहिला गट पहिली ते चौथी, दुसरा गट इयत्ता पाचवी ते आठवी, तिसरा गट इयत्ता नववी ते दहावी गटामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 30 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धा पारदर्शक व्हावी म्हणून गोळीगणी येथील कृषी ग्राम समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
विजेत्या विद्यार्थ्यांना १ मे रोजी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर स्पर्धा ग्राम स्तरावर यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे व तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, उपशिक्षक सुरेश दर्गे, गुरूप्रसाद गेजगे, गांवडे सर, प्राथमिक शाळा गोळेगणी चे शिक्षक शकंर बळीकोंडवार यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डासाळकर तर सुत्रसंचलन व स्पर्धेचे मूल्यांकन प्राथमिक शाळा विषयशिक्षक सचिन दरेकर यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →