पौष्टिक तृणधान्य बाजरी चे महत्व…

बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य पीक आहे. बाजरीचा आहारात  वापर खूप वर्षापासून आपले पूर्वज करीत आले आहेत.इतर तृणधान्य पेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते.शिवाय बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 ग्रॅम,स्निग्ध पदार्थ 5 ग्रॅम, पिष्टमय पदार्थ सदुसष्ट ग्रॅम, फास्फोरस 242 मिलिग्रॅम, कॅल्शियम 42 मिलीग्राम इत्यादी पोषक घटक असतात. या लेखात आपण बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

 बाजरीचे आरोग्यदायी फायदे

  • हृदयरोगापासून सुरक्षा बाजरी मध्ये मॅग्नेशियम हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाहीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते व रुदय सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे बाजरी धान्यातील पोटॅशियम उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी रक्तवाहिन्यांच्या तंत्रावर नियंत्रण ठेवतो.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
  • मधुमेह नियंत्रित ठेवणे मधुमेह टाइप 2 या प्रकारच्या रुग्णांसाठी बाजरीतील मॅग्नेशियम हा घटक इन्शुलिन व ग्लुकोज रिसेप्टरचीक्षमता वाढवून मधुमेह नियंत्रित ठेवतो.

पचनसंस्था सुधारणे बाजरीतील तंतुमय पदार्थ जठरातील चयापचय क्रिया नियंत्रित करून वात दोष दुरुस्त करून कोठा साफ होण्यास मदत होते. त्यामुळे पचन संस्थेचे काम सुरळीत होऊन पोषणतत्वांची शोषण सुधारते. नियमित पचन होऊन विषारी पदार्थ शरीराबाहेर निघाल्यामुळे  रुदय,फुफुस व शरीरातील प्रतिरक्षा रचनेत फायदेशीर सुधारणा होतात.

  • कॅन्सर नियंत्रित करते महिलांमधील स्तनांचा कॅन्सर यावर अतिशय लाभदायक आहे. कारण बाजरीतील तंतुमय पदार्थांमुळे हा आजार नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • दमा रुग्णांसाठी उपयुक्त बालवयातील दमा या आजाराने ग्रस्त झालेल्या लहान मुलांच्या आहारात गव्हाची बाजरीधान्याचा अंतर्भाव केल्यास त्यांना लाभ होतो.
शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →