आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आज दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मौजे -वाकवली ता. दापोली जिल्हा-रत्नागिरी येथिल घोले हायस्कूल वाकवली व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावचे सरपंच श्री निलेश शेठ, हायस्कूलचे मुख्याध्यापक कोंगुळे सर त्यांचा सर्व स्टाफ तसेच कृषी अधिकारी श्री अबगुल, कृषी सहाय्यक श्रीम. जाधव, श्रीम. कोळंबे व कृषी सहायक श्री पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी
उपस्थित होते.