श्रमिक विद्यालय व श्यामरावजी पेजे महाविद्यालय शिवार आंबेरे ता.जि.रत्नागिरी येथे राजमाता जिजाऊ जयंती,श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 जनजागृती कार्यक्रम .

श्रमिक विद्यालय शिवार आंबिरे व कृषि विभाग याच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 12/01/2023 रोजी शिवार आंबिरे मंडळ- पावस ता.जि. रत्नागिरी येथे राजमाता जिजाऊ जयंती,श्री स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषि विभाग रत्नागिरी , श्रमिक विद्यालय शिवार आंबिरे व श्यामरावजी पेजे महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 या विषयी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी पौष्टिक तृणधान्य विकासाची सप्तसुत्री, तृणधान्य आहारातील महत्त्व व महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनेची माहिती दिली. तसेच उपस्थित विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व इतर लोकप्रतिनिधी यांना पौष्टिक तृणधान्य नाचणी या विषयाची माहिती पुस्तिका व पौष्टिक तृणधान्यांचे महत्व सांगणारे पोस्टर्स वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी,रत्नागिरी श्री. विनोद हेगडे ,श्री नंदकुमार मोहिते संचालक अध्यक्ष श्रमिक विद्यालय,तसेच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, बचत गटातील महिला, शेतकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी कृषी विभागातील कृषी सहाय्यक पवार, राऊत उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →