आज दिनांक 13 1 2023 संक्रांत भोगी निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. जाधव साहेब विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद, श्री घाटगे साहेब वि.अधि.कृ.अधिकारी, श्री एस.बी. पवार सर, एन ए आर पी औरंगाबाद, श्रीमती देशमुख मॅडम एमजीएम केवीके , श्री पी. आर. देशमुख जिल्हा कृषी विकास अधिकारी जि. प. औरंगाबाद, श्रीमती पतंगे मॅडम विस्तार शाखा, औरंगाबाद जिल्हा पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ नोडल अधिकारी श्री. किरण वीरकर तसेच सर्व शाखेचे तंत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मा. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद, यांनी मकर संक्रांत / भोगी या सणातील बाजरीचे महत्व विषद केले. तसेच सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश/अवलंब करावा व याबाबत आपल्या स्तरावरून समाजात जनजागृती करावी. याबाबत सूचना केली.
श्री एस.बी. पवार सर, सहयोगी संचालक, एन ए आर पी औरंगाबाद यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्व व उन्हाळी हंगामात बाजरी लागवड तंत्रज्ञान व श्रीमती देशमुख मॅडम, एमजीएम, केवीके यांनी मानवी आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्व या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी मिलेट शपथ घेण्यात आली.