शहीद मॅरेथॉन बरोबर कृषी विभागाचीही मिलेट मॅरेथॉन, जि. सांगली

शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन गीतर्फे जागतिक दर्जा प्राप्त शहीद मॅरेथॉन पर्व १० ही स्पर्धा दिनांक 26 मार्च २०२३ रोजी ०५ किलोमीटर व २१ कि.मी. अशा दोन गटांमध्ये होणार होती, या शहीद मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ यानिमित्ताने पौष्टिक तृणधान्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढ करून लोकांच्या आहारातील प्रमाण वाढवण्यासाठी व या पिकांच्या आहाराविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारामध्ये त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी मिलेट दौड (रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट) आयोजीत करण्याबाबत शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन सांगली यांच्यासोबत कृषी विभागाने समन्वय साधला होता. स्मृती फाउंडेशनने कृषी विभागास शहीद मॅरेथॉन स्पर्धेसाठी सहप्रायोजक केले. कृषी विभागाने यापूर्वी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या आहारातील जनजागृतीसाठी सांगली जिल्हा कृषी महोत्सव, कार्यशाळा, शेत तिथे पोष्टिक तृणधान्य मोहीम, मिलेट ऑफ द मंथ, प्रभात फेरी, रोड शो, बाईक रॅली, पाककृती, पाककला, ग्रामस्तरीय कार्यक्रम, सेल्फी पॉइंट इत्यादी माध्यमातून जनजागृती केली आहे.आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन, सांगली आयोजित व सांगली मिरज कुपवाड, महानगरपालिका सहप्रायोजक या जागतिक दर्जा प्राप्त शहीद मॅरेथॉन सोबत सांगली जिल्हा कृषी विभागाची मिलेट मॅरेथॉन दौड संपन्न करून पौष्टिक तृणधान्याचे प्रचार प्रसिद्धी अत्यंत नियोजनपूर्वक पूर्ण केली. कृषी विभागाच्या या 05 किलोमीटरच्या मिलेट मॅरेथॉन दौड मध्ये प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली, प्रियंका भोसले कृषी उपसंचालक, सागर खटकाळे, उपविभागीय कृषी अधिकारी विटा, मयुरा काळे तंत्र अधिकारी व कृषी विभागातील अनेक अधिकारी/ कर्मचारी यांनी भाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →