दिनांक २४.०३.२०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व नाबार्ड यांचे समन्वयाने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्तानेपाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत महिलांनी तृणधान्य पासून विविध पदार्थ तयार करून उत्स्पुर्त पणे सहभाग घेतला. पाककृती स्पर्धेत मा. मनीषा खात्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार उपस्थित होत्या. स्पर्धेचे निरीक्षक डॉक्टर वैशाली चव्हाण , श्रीमती आरती देशमुख विषय विशेष तज्ञ गृह विज्ञान , प्राध्यापक श्री.पाटील व श्रीमती मीनाक्षी वळवी तंत्र अधिकारी विविध पदार्थांचे निरीक्षण करून विजेत्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.