दिनांक २१ मार्च ते २४ मार्च २०२३ या कालावधीत महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग ,कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट उत्पादिन वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले.प्रदर्शनात एकूण ५५ महिला बचत गट व २०० महिलांनी सहभाग घेतला असून पौष्टिक तृणधान्य पासून तयार केलेले विविध उत्पादने व इतर घटकांचा समावेश होता. त्यावेळी मा. जिल्हाधिकारी श्रीमती. मनीषा खात्री ,मा. श्रीमती मीनल करनवाल,प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार उपस्थित होते.