“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३” च्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये मा.श्री.अब्दुलजी सत्तार, मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ” मिलेट दौड ” चे उद्घाटन.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मिलेट दौड कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बीड जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बाबासाहेब जेजुरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कृषी विभागातील अधिकारी ,कर्मचारी यांनी नियोजन केले. वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी मिलेट दौड प्रभात फेरी कार्यक्रमात भाग घेऊन स्वतः राज्याचे कृषिमंत्री आदरणीय श्री अब्दुल सत्तार साहेब सहभाग घेतल्यामुळे बीड नगरीला शोभा आली. शेतकऱ्याच्या अडीअडचणी व त्यावर उपाय यावर विचार मांडून तृणधान्य पिकाबाबत फायदे आणि आरोग्यासाठी उपयुक्त कसे आहे याबाबत माहिती दिली. यावेळी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री बाबासाहेब जेजुरकर(DSAO, बीड) यांनी केले .

” मिलेट दौड ” ला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. अजित पवार साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव सोळंके साहेब, जिल्हा शैल्य चिकित्सक श्री सुरेश साबळे , अपर जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब, तहसीलदार श्री सुहास हजारे साहेब ,प.स.बीड चे गटविकास अधिकारी श्री अनिरुद्ध सानप साहेब उपविभागीय कृषी अधिकारी,बीड सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव श्री सुरज मडके, जिलहा गुणवत्ता व नियंत्रण अधिकारी, श्री गरंडे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री गंडे साहेब ,बीड जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे “मिलेट दौड” कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील एनजीओ व कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते..

“श्री अन्न” पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व विषद करताना मा.मंत्री कृषी.
मा.मंत्री यांनी हिरवा झेंडा फडकावून “मिलेट दौड” चे उद्घाटन केले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →