आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य 2023 अंतर्गत महिला मेळावा

दिनांक 12 जाने. मौजे म्हाते खुर्द. ता.जावळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य 2023 अंतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला सदर प्रसंगी सरपंच श्री दळवी मा. उविकृअ चंद्रकांत गोरडसो ताकृअ श्री रमेश देशमुख KVK बोरगाव चे शास्त्रज्ञ श्री महेश बाबर श्री संग्राम पाटील, श्री कल्याण बाबर श्री सुजय सकटे, मं. कृ. अ.संजय घोरपडे, कृप विजय शिंदे कृस. नितीन जांभळे,आहार तज्ञ डॉ. सुहित गिल्डा ,उत्कर्ष पॅथॉलॉजी लॅब सातारा च्या गीता मॅडम उपस्थित होत्या. बोरगाव येथील सर्व शास्त्रज्ञांनी पौष्टिक तृणधान्य लागवड प्रक्रिया व हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. आहार तज्ञ डॉक्टर गिल्डा यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले. उत्कर्ष लॅब कडून सर्व महिलांचे रक्तगट तपासले व महिलांना मार्गदर्शन केले. श्री गोरडसो व श्री देशमुख सो यांनी जाने ते डिसे अखेर राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली व पौष्टिक तृणधान्ये लागवड करणे बाबत आवाहन व मार्गदर्शन केले. तालुक्यातील इतर कृषी सहाय्यक ही उपस्थित होते श्री नितीन जांभळे व आत्माचे श्री सचिन नेवसे महिला बचत गटाने कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →