दिनांक:12/01/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमगाव जिल्हा गोंदिया यांचे वतीने पंचायत समिती कार्यालय आमगाव सभागृहात तालुकास्तरीय जागतिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सभापती श्री.आर.आर.गौतम व प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती श्री.एन.एफ.चौधरी व सौ.आर.एम.आयचित खंडविकास अधिकारी आमगाव व पंचायत समिती सदस्य (सर्व) उपस्थित होते.तसेच मार्गदर्शक म्हणून मा.श्री महेंद्र दिहारे मंडळ कृषी अधिकारी आमगाव हे उपस्थित होते.श्री.महेंद्र दिहारे मंडळ कृषी अधिकारी आमगाव यांनी पोष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पने अंतर्गत ज्वारी ,बाजरी ,नाचणी ,वरई ,राजगिरा इत्यादी पोष्टीक तृणधान्य पिकाच्या उत्पादन व लागवड क्षेत्र कसे वाढवता येईल व या पिकांचे मानवी आरोग्य विषयक फायदे व लोकांच्या आहारातील महत्त्व व प्रमाण वाढवणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.