पौष्टीक तृणधान्य प्रचार व प्रसिध्दी आंबेसरी आश्रमशाळा

आज बुधवार दिनांक ११जानेवारी रोजी आश्रमशाळा आंबेसरी येथे उपस्थित शेतकरी बंधू भगिनी सोबत या शाळेचे विद्यार्थी देखील होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री.अनिल नरगुलवर साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री जगदिश पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टीक तृणधान्य बाबत आरोग्यदायी महत्व समजावून सांगितले.
तसेच कृषी पर्यवेक्षक श्रीमती.विशे मॅडम यांनी आहारातील पौष्टीक तृणधान्य महत्त्व व गरज याबाबत माहिती दिली.तालुक्याचे आत्माचे समन्वयक श्री अशोक महाला यांनी प्रस्तावना करून पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम पूर्ण देशात राबवून सर्वांचे आरोग्य सुधारावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत अस सांगितले.
गावातील ग्रामसेवक यांनी आपण स्वतः च्या आहारात किमान नागली चे पदार्थ रोज असावेत आणि यासाठी आपली पूर्वीची लागवड पद्धती पुन्हा सुरू करावी असे आवाहन केले.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सकाळ दुपार आपण वाडा पाव खातोय त्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.तरीही आपण नागली वरी पासून विविध पदार्थ बनवून ते खावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अनिल नरगगुलवार यांनी केले. कृषी विभागामार्फत यासाठी प्रात्यक्षिक म्हणून बियाणे उपलब्ध होईल त्यावेळी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगदिश पाटील यांनी केले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थी यांना पौष्टीक तृणधान्य चे राजगिरा लाडू वाटप करून आतापासूनच पौष्टीक तृणधान्य पदार्थाचा अंगीकार करावा असे सुचविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने कापडणे ता. धुळे येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हुरडा पार्टीचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यासाठी मौजे कापडणे येथील प्रगतशील शेतकरी तसेच उत्पादन उत्पादकता पीक स्पर्धा यामध्ये पारितोषिक मिळवलेले श्री राजाभाऊ पाटील यांचे रब्बी ज्वारीच्या

Read More »

दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी कृषि विभाग परभणी द्वारे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 2023 आयोजन

दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी परभणी कृषी विद्यापीठ येथे कृषी विभागाच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य याविषयी धान्य महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

Read More »

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *