मौजे पाटोदा येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शेतकरी व लाभार्थी यांच्यासाठी शासन आपल्या दरबारी दारी या योजनेअंतर्गत कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023बाबत माहिती देताना मंडळ कृषी अधिकारी पाटोदा श्री बडाख

दिनांक 10 /3/ 2023 रोजी विशाखा गार्डन मौजे पाटोदा येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शेतकरी व लाभार्थी यांच्यासाठी शासन आपल्या दरबारी दारी या योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या निविष्ठा आणि यांत्रिकीकरण याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी पाटोदा श्री बडाख साहेब यांनी विविध योजना बाबत माहिती दिली यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,pmfme, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023बाबत माहिती, महाडीबीटी वरील कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड आदी विविध योजना बाबत मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमांमध्ये स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यांनी कृषी विभागाचे भरभरून कौतुक केले. यावेळी सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्री जनार्दन क्षीरसागर ,श्री भास्करराव नाईकवाडी ,पाटोदा गावाचे कृषी सहाय्यक प्रकाश जवणे यांनी विशेष परिश्रम घेतले समवेत अवधूत मेहेत्रे ,धनंजय सोनवणे, कडनोर मॅडम ,तांबे मॅडम, विमा प्रतिनिधी बाजीराव पाचपुते हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →