मौजे दापूर येथील नेहरवाडी दापुर येथील आंगणवाडी शाळेत शेतकरी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला..यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिला बघिनी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 या निमित्ताने पौष्टीक तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व समजुन सांगण्यात आले व आपल्या रोजच्या आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी यांचा समावेश करावा असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने उपस्थीत महिला शेतकऱ्यांना करण्यात आले.
या वेळी कृषी अधिकारी वनिता शिंदे मॅडम, सिस्टर साळुंके मॅडम,अंगणवाडी सेविका राधाताई दळवी ,अंगणवाडी मदतनीस झुमराबाई आव्हाड, आशा वर्कर रेश्मा आव्हाड,पालक यमुनाबाई एकनाथ आव्हाड ,चंदाबाई काळे , सोनाली शेळके तसेच अंगणवाडीतील बालके तसेच पालक वर्ग आदी उपस्थित होते.