जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदे येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण वर्ष 2023” या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य दीन साजरा करण्यात आला…यावेळी कृषी विभागाच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी श्री. अशोक अल्हाट साहेब यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी यांना ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर या पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व समजुन सांगीतले व आपल्या रोजच्या आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी यांचा समावेश करावा असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.
या वेळी गोंदे गावचे सरपंच श्री.अनिल तांबे साहेब , ग्रामसेवक भनगीर भाऊसाहेब ,मंडळ कृषी अधिकारी श्री.अशोक अल्हट साहेब, गावच्या कृषी सहाय्यक वनिता शिंदे मॅडम, , कृषी साहाय्यक श्रीहरी केदार तसेच जि. प. प्रा.शाळा गोंदे शाळेचे उपाध्यक्ष श्री. अशोक तांबे तसेच शाळेचे मुख्यध्यापक धिंडले सर, आव्हाड सर, तसेच शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.