दिनांक 9.03.2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह बाबत मार्गदर्शन व माहिती तालुका कृषि अधिकारी व समाधान पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी जी एस हायस्कूल अमळनेर येथे महिला मेळाव्यात देण्यात आली.सदर कार्यक्रमास माननीय श्रीमती संपदा उमेश पाटील, श्रीमती स्मिता वाघ माजी आमदार विधान परिषद,श्रीमती जयश्री पाटील जिल्हा परिषद सदस्य, ऍड.व्ही आर पाटील माजी जि प सदस्य, हिरालाल पाटील भाजपा तालुकाध्यक्ष तसेच तालुका कृषी अधिकारी श्री भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी श्री मयूर कचरे,अविनाश खैरनार,बीटीएम भूषण पाटील व कृषी विभागातील सर्व कृषि सहाय्यक कर्मचारी , पंचायत समितीचे अधिकारी , कर्मचारी , मावीम ,उमेद, अधिकारी वर्ग तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस विविध गटाच्या सदस्या अध्यक्ष कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांनी कृषी विभागाच्या अंतरराष्ट्रीय तृ ण धान्य वर्ष 2023 रांगोळी व सेल्फी पॉईंटला भेट देऊन सेल्फी घेतल्या व माहिती दिली.