मौजे लाडघर ,ता. दापोली जि. रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

आज दि. ११/१/२०२३ रोजी मौजे लाडघर ता दापोली जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या बाबत माहीती देण्यात आली. तसेच नाचणी पासून बनवल्या गेलेल्या विविध पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात आली तसेच श्रीमती कर्देकर मॅडम यांनी नाचणी पासून विविध पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी मा दिशांत कोळप, तालुका कृषि अधिकारी मा प्रदिप थेटे यांनी मार्गदर्शन केले .कृषि अधिकारी सुभाष अबगुल सरपंच सौ सुजाता साळवी सौ गुहागरकर मंडळ कृषि अधिकारी दाभोळ बी.टीएम गणेश कोरके कृ.स शुभांगी कुलकर्णी कृ.स सुर्यकांत काष्टे श्रीमती कर्देकर तसेच गावातील महिला बचत गटातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →