पाताळगंगा : ९ मार्च, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनांचे औचित्य साधून टी.एन.एम. पब्लिक स्कूल आसरोटी येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य महत्त्व सांगून साजरा करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड बानखिले ,यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी धान्यापासून रांगोळी स्पर्धेचे निंबध तसेच चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.