आज दिनांक 8/03/2023रोजी मौजे गवडी ता जावळी जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ वर्षाचे निम्मीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी मौजे निझरे, तालुका जावळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी घोरपडे साहेब, कृषी सहाय्यक जगदीश धुमाळ, पीडीएसएस पुणे या संस्थेचे श्री रोहन सर, पंडित मॅडम, सरपंच सतीश भिलारे, उपसरपंच शकुंतला भिलारे,ग्रामसेवक कदम, मुख्याध्यापक श्री.धनावडे सर, महिला उद्योजिका ज्योती कदम ,आसाम रायफल येथे कार्यरत असणाऱ्या स्नेहल केंजळे मॅडम तसेच निझरे गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.मंडळ कृषी अधिकारी घोरपडे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व संतुलित आहार याविषयी मार्गदर्शन केले.संस्थेच्या पंडित मॅडम यांनी सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. श्री.जगदीश धुमाळ यांनी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड गांडूळ खत युनिट या विषयी माहिती दिली.सौ. शकुंतला भिलारे यांनी महिला बचत गटाविषयी माहिती दिली, तसेच उपस्थितांचे आभार मानले.यावेळी फळबाग लागवड तसेच भाजीपाला पिकवणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →