आज दिनांक 8/03/2023रोजी मौजे गवडी ता जावळी जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ वर्षाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक 8/03/2023रोजी मौजे गवडी येथे जागतिक महिला दिन निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते,सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. रमेशजी देशमुख साहेब, सरपंच राजाराम खुडे, माजी सरपंच, बजरंग चौधरी गवडी शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री.अजय पवार, कृषी सहाय्यक विलास कदम हे उपस्थित होते.
यावेळी रमेश जी देशमुख तालुका कृषी अधिकारी मेढा यांनी महिलांना आपल्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य वापर कशाप्रकारे करावा व समतोलित आहार कसा ठेवावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्यांमध्ये येणारी पिके नाचणी, राळा, वरी,बाजरी, ज्वारी या पिकांचे आहारात असणारे महत्त्व विशद केले. तसेच महिला सबलीकरण महिला बचत गट घर तेथे गांडूळ युनिट बांधकाम करून सेंद्रिय शेतीकडे वळावे याविषयी माहिती दिली. माजी सरपंच बजरंग चौधरी यांनी गावातील स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले, सरपंच श्री राजाराम खुडे यांनी उपस्थित अधिकारी व महिलांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →