दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त ग्रामपंचायत रामपुर ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी श्री. राहुल आडके , तसेच मार्गताम्हणे मंडळ मधील कृषी पर्यवेक्षक श्री. डी के काळे, श्री. एल डी शिंदे तसेच सर्व सहायक उपस्थित होते. या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक श्री. विकास पिसाळ यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच या दिवशी या ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.