शिराळे खुर्द, ता.शिराळा जि.सांगली

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत दिनांक:-8/03/2023 रोजी मौजे:-शिराळे खुर्द येथे शेतकरी व बचत गटांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व उत्पादन वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक- आत्मा -श्री अमोल माळी यांनी शेतकरी बचत गट निर्मिती व शेतकऱ्यांना मिळणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी सहाय्यक -श्री राहुल शिंदे यांनी केले व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक- श्री योगेश नाईक यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये शिराळे खुर्द गावच्या लोकनियुक्त नूतन महिला सरपंच सौ शर्मिला माने यांनी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कृषी विभागामार्फत येणाऱ्या विविध योजनां चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले . सदर कार्यक्रमांमध्ये मंडळ कृषी अधिकारी-कोकरूड श्री अरविंद शिंदे, कृषी पर्यवेक्षक-कोकरूड श्री अजित भोसले, शिराळे खुर्द गावचे माजी सरपंच-श्री दत्तात्रय माने व सदर गावचे महिला पोलीस पाटील-सौ अनिता पाटील व गावातील महिला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →