कृषि विभाग व दै. सकाळ अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन…

रुपेश राजाराम बिऱ्हाडे
तालुका प्रतिनिधी जामनेर

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गजानन महाराज मंदिर नांद्रा. प्र. लो येथे प्रगतशील महिला शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी डाॅ. अभिमन्यू चोपडे यांनी महिलांना मार्गदर्शन करतेवेळी जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य, पी. एम. एफ. एम. ई जनजागृती पंधरवडा या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगतशील महिला शेतकरी यांचा प्राथमिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. अभिमन्यू चोपडे तालुका कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राकेश पाटील ,समुह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे,कृषि पर्वेक्षक बी. के. चिम कृषि सहाय्यक श्याम दुसाने,कृषि सहाय्यक सुनील गायकवाड, कृषि सहाय्यक मिलिंद पाटील, प्रगतशील शेतकरी दिवाकर पाटील, युवराज पाटील व ईतर शेतकरी उपस्थित होते.

गजानन महाराज मंदिर नांद्रा. प्र. लो येथे कार्यक्रम पार पडला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →