पौष्टीक तृणधान्याचा रोजच्या आहारात समावेश करावा.. कृषि सहायकांचे आवाहन

दिनांक: 3/03/2023 रोजच्या धावपळीच्या जीवनात आहाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पोटाच्या विकारांपासून वाचण्यासाठी सर्वांनी रोजच्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा समावेश करावा असे आवाहन कृषि सहायक श्री वैभव लेनेकर यांनी केले आहे. वानेवाडी येथे कृषि विभागामार्फत आयोजीत आंतररष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023अंतर्गत प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमात ते बोलत होते. पौष्टीक तृणधान्य आपल्या आहारात तसेच शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती देणारे कसे आहे याचे देखील सविस्तर विवेचन त्यांनी उपस्थितांना केले. सद्यस्थितीत नाचणी बाजरी व ज्वारी या तृणधान्यांना मागणी वाढत असल्याने त्याचे उत्पादन घेउन शेतकरी गटामार्फत त्याची विक्री केली तर सामूहिक प्रयत्नातून आर्थिक प्रगती सहज शक्य असल्याचे देखील त्यांनीं सांगितले.

वाणेवाडी येथील हनुमान मंदीरात आयोजीत या कार्यक्रमास गावातील प्रगतिशील शेतकरी पोलिस पाटील इ उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आभार कृषि मित्र यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →