दिंडी व कार्यशाळा जि.सांगली

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सांगली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करणेच्या दृष्टीने शेतकरी व सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रचार व प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने बालगंधर्व नाट्यमंदिर मार्केट यार्ड मिरज या ठिकाणी मा.अध्यक्ष,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ तथा जिल्हाधिकारी सांगली मा. डॉ. राजा दयानिधी यांचे अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करणेत आली. या कार्यशाळेचे उद्घाटन आणि शुभारंभ त्यांचे हस्ते करणेत आला.मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व व उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांचे शुभहस्ते बाजरी पौष्टिक तृणधान्य या माहिती पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. सदर कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी आणि आहारतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळा सुरु होणेपूर्वी कृषि विभागामार्फत तृणधान्य दिंडी मिरज शहरातून काढणेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →