आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत मौजे पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टीचे आयोजन तालुका कृषी अधिकारी वाई श्री प्रशांत शेंडे व मंडळ कृषी अधिकारी श्री रविंद्र बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी, बोडके मॅडम कृषी सहाय्यक, जाधव मॅडम कृषि सहाय्यक ,श्री मोरे कृषी सहाय्यक ,आढळ मॅडम कृषी सहाय्यक व श्री यमगर, श्री बनसोडे कृषी पर्यवेक्षक तसेच गावाचे सरपंच सौ उषा बाबर ,उपसरपंच आनंदराव हगवणे गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या उपस्थित शेतकऱ्यांना श्री प्रदीप देवरे यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी श्री बनसोडे कृषी पर्यवेक्षक यांनी उपस्थित उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.