आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निम्मित मंडळ औंध अंतर्गत मौजे भोसरे ता खटाव जि सातारा येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

आज मा. तालुका कृषि अधिकारी, खटाव श्री. राहुलजी जितकर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी कार्यालय, औंध अंतर्गत मौजे भोसरे येथे विविध विषयांवर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त श्रीमती पी. डी. लिपारे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्यावर आधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले, तसेच यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ग्रामीण विकास केंद्र चे प्रभारी अधिकारी मा. श्री. उमेश निकम यांनी बँकेच्या कृषी विषयक विविध योजना व आर्थिक सहाय्य याविषयी मार्गदर्शन केले.पौष्टिक तृणधान्य विशेषज्ञ मा. श्री. नितीनजी जाधव यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी औंध मंडळचे मंडळ कृषी अधिकारी श्री. अक्षय सावंत , कृषी पर्यवेक्षक श्री. के. आर. शिंदे , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. गणेश खिलारे , कृषी सहाय्यक श्री. यु. एम. तिकुटे ,
कृषी सहाय्यक श्री. एम. एम. गायकवाड ,कृषी सहाय्यक श्री. गणेश सपकळ , कृषी सहाय्यक श्री. अमोल चोरमले , कृषी सहाय्यक श्री. नितीन कांबळे वपरिसरातील शेतकरी बांधव व महिला शेतकरी उपस्थित होते. कृषि सहाय्यक श्री. उत्तम तिकुटे यांनी प्रास्ताविक केले, मंडळ कृषि अधिकारी श्री. अक्षय सावंत यांनी आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →