आदिम जमाती विकास व संवर्धन या योजने अंतर्गत कृषी माल प्रक्रिया व विपणन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले.

आज दिनाक 03 मार्च 2023 रोजी कृषि विभाग सुधागड कृषि तंत्रज्ञान व्यवस्थपन यंत्रणा (आत्मा) व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांचे संयुक्त विद्यमाने दि प्राईड इंडिया लिमिटेड सुधागड पाली येथे आदिम जमाती विकास व संवर्धन या योजने अंतर्गत कृषी माल प्रक्रिया व विपणन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणावेळी तालुका कृषी अधिकारी सुधागड श्री. जे.बी.झगडे यांनी प्रास्तविका मध्ये प्रशिक्षणार्थींना अदिम जमाती प्राशिक्षणाच्या माध्यमातून कातकरी बांधवानी त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ करावी व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा या बाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी श्री.सुधाकर पाध्ये विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र किल्ला- रोहा यांनी उपस्थित आदिवासी महिला शेतकरी बांधवांना शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर कशाप्रकारे त्याची गुणवत्ता वाढते, तसेच कोणत्या शेतमालावर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच नाचणी प्रक्रिया करताना कोणते कोणते मूल्यवर्धित पदार्थ तयार करतात व त्यांच्या पाककृती याबाबत मार्गदर्शन केले. श्री. सौरभ साबळे जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी PMFME योजना याविषयी माहिती सांगितली. सादर कार्यक्रमात श्री.वसंत मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक, दि प्राईड इंडिया, प्राईड एंडिया यांचे सर्व समन्वयक, श्री. जी.एम. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.प्राजक्ता पाटील (काटकर), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, सुधागड यांनी केले, या प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →