तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहादा मार्फत मौजे वैजाली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त वैभव विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती…. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने रांगोळी व चित्रे काढून स्पर्धेत भाग नोंदवला…. विजेता विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले आहेत…. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृती करण्यात आली… याकरिता वैभव विद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहकार्य केले…