कळंब तालुक्यातील नायगाव येथे बुधवार दिनांक ०१.०३.२०२३ रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य व आहारातील तृणधान्याचे महत्त्व वाढवण्यासाठी जाणीव जागृती करण्यासाठी जि. प. प्रा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्रयालयातील कृषी अधिकारी संतोष हुरगट यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत चर्चा करत मार्गदर्शन केले. ज्वारी बाजरी भगर याचे आहारातील महत्त्व आणि त्याचा उपयोग यासंदर्भात माहिती दिली.
आज ज्या काही शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत प्रत्येकामध्ये दिसत आहेत त्याचा आणि आपल्याकडे तयार होणाऱ्या ज्वारी बाजरी याचा संबंध सांगितला . तसेच आपण आपले धान्य विसरून परदेशी धान्याच्या मागे लागून विविध आजारांना बळी पडत आहोत यापासून मुक्तता मिळवायची असेल तर तृणधान्य शिवाय पर्याय नसल्याचे सांगत सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने तृणधान्य महत्त्व दिले जात नाही तृणधान्यचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन तुम्हाला ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, भगर, नाचणी यांचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे अवाहन केले.तसेच विद्यार्थ्यांना तृणधान्याचे महत्त्व पटवण्यासाठी राजगिरा लाडूचे वाटप करून प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. यानंतर विक्रम पाटील यांच्या शेतात हुरडा पार्टीचे नियोजन करण्यात आले यावेळी सरपंच ,उपसरपंच ,तालुका कृषी अधिकारी कळंब मा. बी बी जाधव मंडळ कृषी अधिकारी शिराढोण भुजंग लोकरे कृषी पर्यवेक्षक उमेश पोतदार, वैभव तांबारे कृषी सहाय्यक भाग्यश्री गवळी, दिलीप आवाड, वैशाली चंदनशिव, मीरा भिसे, कृष्णा जाधव यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.