वाडा तालुक्यातील मौजे आंबीटघर येथे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे आबिटघर येथे आज दिनांक 28/02/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच औचीत्य साधून कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा.कृषी पर्यवेक्षक श्री.घरत साहेब यांनी मार्गदर्शन करताना प्रचलित तृणधान्यच्या खाद्यपद्धती आणि पारंपरिक खाद्यपद्धती आणि आहारात समाविष्ट करावयाची तृणधान्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2023 – 24 करिता कमी खर्चात,कमी पाण्यात अल्पश्रमात येणारी पिके काजू,सीताफळ लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री शिंदे साहेब यांनी पंचायत समितीच्या कृषी संलग्न योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला मा.उप सभापती जगदिश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्या भक्ती ताई वलटे, अमोल पाटील उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य कृषी सहाय्यक श्री आर. आर. विघ्ने व शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →