वाडा तालुक्यातील चांबळे गावात पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम

मौजे चांबळे येथे आज दिनांक 24/02/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच औचीत्य साधून कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होत या कार्यक्रमास मा.कृषी पर्यवेक्षक श्री.घरत साहेब यांनी मार्गदर्शन करताना प्रचलित तृणधान्यच्या खाद्यपद्धती आणि पारंपरिक खाद्यपद्धती आणि आहारात समाविष्ट करावयाची तृणधान्य याबाबत विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2023 – 24 करिता कमी खर्चात,कमी पाण्यात अल्पश्रमात येणारी पिके काजू,सीताफळ लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मागेल त्याला शेततळे, तलावातील मत्स्य शेती भात मजगी, व इतर योजनांची योजनांची माहिती देण्यात आली तसेच या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री शिंदे साहेब यांनी पंचायत समितीच्या कृषी संलग्न योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाला माननीय सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य कृषी सहाय्यक श्री आर. ए. चव्हाण व शेतकरी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →