पौष्टिक तृणधान्याबाबत विशेष कार्यशाळा तुळजापूर येथे संपन्न

तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.महाराष्ट्र शासनाने देखील महिना निहाय विविध पिकांविषयी जनजागृती करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुषंगाने तुळजापूर येथे तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा काल दिनांक २८/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस तंत्र अधिकारी विस्तार श्री. दीपक दहिफळे, तालुका कृषि अधिकारी श्री. मिलिंद बिडबाग, मंडळ कृषी अधिकारी श्री. सत्यजित देशमुख, श्री. संदीप आयुनुले कु. दिपाली सरोदे इ उपस्थित होते.

यावेळी तंत्र अधिकारी श्री. दीपक दहिफळे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या आहारात त्याचा समावेश करावा असे आव्हान त्यांनी केले. तालुका कृषि अधिकारी श्री. बिडबाग यांनी तृणधान्य चे पौष्टिक घटकांबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यशाळेचे वैशिष्ट्य हे होते कि कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आपल्या दुपारच्या जेवणात पौष्टिक तृणधान्यपासून बनवलेले पदार्थ आणण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या डब्ब्यात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी नाचणीचे लाडू, राळ्याचा भात, भगरीचा शिरा इ. चा समावेश केला होता. महिला कृषी सहायक यांनी नाचणीचे लाडू प्रत्येकाला वाटप करून कार्यशाळेची सुरुवात केली.

सदर कार्यशाळेमध्ये उपस्थितांचे व मार्गदर्शकांचे आभार श्री. अजित बरडे यांनी व्यक्त केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →