घाटनांदूर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद: दिनांक २८/०२/२०२३ रोजी घाट नांदूर येथे वाटर संस्थेच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना पौष्टिक तृणधान्य वर्ष शासनाने जाहीर केले असल्याने आपल्या आहारात त्याचा समावेश करण्याबाबत देखील आव्हान केले. तसेच ज्वारी बाजरी नाचणी इ तृणधान्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.