महिला बचत गटांनी तृणधान्याच्या पदार्थाची बाजारपेठ उभी करावी, कृषि उपसंचालकांचे आव्हान

घाटनांदूर ता.भूम दिनांक २८/०२/२०२३ महिला बचत गटांनी आता सध्या प्रचलित असलेले लोणचे पापड इ. पदार्थांबरोबरच पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थाचे उत्पादन करून त्याची बाजारपेठ उभी करावी असे आव्हान उस्मानाबाद जिल्ह्याचे कृषि उपसंचालक श्री. अभिमन्यू काशीद यांनी केले.

ते काल वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट द्वारा आयोजित महिला मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सध्याचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याच उद्देशाने मोजा घाटनांदुर येथे वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट द्वारा महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. ह्या मेळाव्यामध्ये एकूण 15 गावातील 80 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोजा घाटनांदुर तालुका भूम येथे घाटनांदुर व परिसरातील गावातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिमन्यू काशीद यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला बचत गटांना प्रचलित असलेले लोणचे पापड इत्यादी पदार्थांबरोबरच पौष्टिक गुणधर्म पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ तयार करून ते बाजारामध्ये आणण्याबाबत आव्हान केले. श्री अभिमन्यू काशीद यांनी पुढे सांगितले की, सध्या पौष्टिक तृनाधान्या पासून बनवलेल्या पदार्थांना मोठय प्रमाणात मागणी आहे. हि सुवर्णसंधी ओळखून महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इ. पासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थाचे उत्पादन केले तर त्यांना सध्या मार्केटमध्ये मोठी मागणी असल्यामुळे आर्थिक उन्नती साधता येईल.

या कार्यक्रमास गावाचे सरपंच श्री. पवार वाटर संस्थेच्या पठाण मैडम, कृषि सहायक ग्रामसेवक गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमास गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थिती लावली होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →