तालुका कृषि अधिकारी, आजरा मार्फत तालुका स्तरीय भव्य पाक कला स्पर्धा आयोजित करणेत आली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त सोमवार दि.२७/०२/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, आजरा मार्फत तालुकास्तरीय भव्य पाककला स्पर्धा आयोजित करणेत आली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी मा. श्री. एस.एम.रोकडे सर, तहसीलदार मा. श्री. विकार अहिर सर, गट विकास अधिकारी मा. श्री. डी. एच. दाईंगडे सर, तालुका कृषि अधिकारी मा. श्री. के. एम. मोमीन सर, मंडळ कृषि अधिकारी, आजरा मा. श्री. एस.टी.गुरव सर, मंडळ कृषि अधिकारी उत्तुर, मा. श्री. पी.जी.पाटील सर, कृषि पर्यवेक्षक मा. श्री. व्हि.आर.दळवी सर, तालुका आर्थिक समावेशक श्री.शांताराम कांबळे सर, कांबळे मॅडम, देसाई मॅडम, सांगावकर मॅडम, मोहिते मॅडम, तसेच कृषि विभागाचे अधिकारी, कृषि सहाय्यक व इतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेत तालुक्यातील ५० महिलांनी सहभाग घेतला व स्पर्धेसाठी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →