आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा निमित्त मौजे सासवड ता.पुरंदर येथे तृणधान्य (ज्वारी) पाककृतीस्पर्धा

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा निमित्त मौजे सासवड ता.पुरंदर येथे तृणधान्य (ज्वारी) पाककृतीस्पर्धा तसेच प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना , महिलांसाठी आरोग्य प्रशिक्षणाचे आयोजन सासवड येथील बोरकर फार्म येथे शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केले होते. सदर पाककृती स्पर्धा व प्रशिक्षणास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमावेळी मा. तालुका कृषी अधिकारी श्री सुरज जाधव यांनी प्रस्तावित करून आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आयोजित करण्याचे महत्त्व विशद केले व त्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉ. घनश्याम खांडेकर, डॉ. संतोष जगताप यांनी तृणधान्यपीके व त्याचे आहारातील महत्त्व तसेच आरोग्य विषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. श्री वैभव कुडले यांनी प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शक केले. श्री शेखर कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सासवड यांनी कृषी विभागाच्या योजना बाबत मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप रवींद्र केसे तसेच सासवड मंडळ मधील सर्व कृषी सहाय्यक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली गरड यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →