महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे जि. रत्नागिरी येथे आयोजित रत्नागिरी सरस मोहत्सवादरम्यान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी यांचेमार्फत अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यावेळी सहभागी स्पर्धाकांनी नाचणीचे मोदक, नाचणीची भेळ, नाचणी मंचुरियन, नाचणी उताप्पा नाचणी सुरळी वडी नाचणीचे लाडू, मिक्स तृणधान्य पासून वडे इ पदार्थ सादर केले. तसेच यामधून महिलांची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना सन्मानित करण्यात आले