नाशिक (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.त्यानुसार फेब्रुवारी महिना हा पौष्टिक तृणधान्य महिना म्हणून साजरा केला जात आहे या संकल्पाने आज विद्यालयात इयत्ता ५ वी ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते या पाककला स्पर्धेमध्ये तृणधान्यावर आधारित पदार्थ बनविण्यात आले गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, भगर या तृणधान्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी अतिशय पौष्टिक पदार्थ बनविले या पदार्थांमध्ये बाजरीची भाकरी, तांदळाचा डोसा त्याचबरोबर बाजरीची खिचडी, गव्हाची खीर, नागलीच्या भाकरी, नागलीचे बिस्किट, शंकरपाळे, मिक्स तृणधान्यांचे थालीपीठ, तृणधान्यांच्या पिठापासून कटलेट, गव्हाच्या पिठाचा केक यांसारखे विविध पदार्थ बनविण्यात आले त्याचबरोबर अतिशय आकर्षक पणे या पदार्थांची मांडणी केली गेली होती .या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य जगन्नाथ तिदमे हे उपस्थित होते. त्याच बरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारूंगसे,उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे,पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांनी आहारात पौष्टिकतेच्या दृष्टीने नाचनी ,बाजरी, ज्वारी, वरई यासारख्या पौष्टिक तृणधान्य चे विशेष महत्त्व आहे हे स्पष्ट केले. आहाराचा आस्वाद घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यात त्यांनी जीवनात संतूलित आहाराचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोषण आहार प्रमुख संतोष शिंदे सांस्कृतिक उपप्रमुख अर्चना गाजरे, अलका निकम,प्रतिभा उशीर,सुनंदा कदम,संगीता डेर्ले,क्रांतीदेवी ठाकरे,किर्ती बच्छाव तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.