मौजे- कुडाळ तालुका-जावळी ,जिल्हा -सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत ज्वारी पीक प्रात्यक्षिक प्लॉट भेट व हुरडा पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

मौजे- कुडाळ तालुका-जावळी ,जिल्हा -सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत ज्वारी पीक प्रात्यक्षिक प्लॉट भेट व हुरडा पार्टी कार्यक्रमाचे आयोजन श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी व श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक वक्ते श्री. भानुदास चोरगे कृषी सहाय्यक , पी. व्ही.खाडे कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्वारीचे आहारातील महत्व व हुरड्याचे महत्व व फायदे श्री. भानुदास चोरगे यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी हुरडा पार्टीत उपस्थिती दाखवून हुरड्याचा आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →