आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त दहिवडी ता माण जि सातारा येथे पौष्टीक तृणधान्य प्रदर्शन व पाककृती स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दहिवडी यांच्या वतीने *आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त शुक्रवार दिनांक 24/02/2023 रोजी सकाळी 11.00 वा. बालाजी मंगल कार्यालय (भटकीमळा रोड), दहिवडी येथे पौष्टीक तृणधान्य प्रदर्शन व पाककृती स्पर्धा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर प्रदर्शन उदघाटन प्रसंगी मा.श्री.भास्करराव कोळेकर साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण., डॉ.वसुधा कर्णे मॅडम कर्णे हॉस्पिटल,दहिवडी., मा.श्री. सुहास रणसिंग तालुका कृषी अधिकारी, दहिवडी,. माणदेशी फौंडेशन महिला बचत गट प्रतिनिधी सौ. तोरणे मॅडम ई. मान्यवर उपस्थित होते. तसेच पाककला स्पर्धेसाठी मार्गदर्शन व निरीक्षक म्हणून सौ.पोळ मॅडम., मा.सौ.डॉ प्रियदर्शनी देशमुख विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र कालवडे., मा.श्री.डॉ.भरत खांडेकर, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कालवडे मान्यवर लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री. सुहास रणसिंग साहेब यांनी केले, सौ.डॉ.कर्णे मॅडम यांनी तृणधान्यातील पोषण मूल्यांची माहिती व महत्व याविषयी खूप छान मार्गदर्शन केले., तसेच कार्यक्रमास श्री.डॉ.भरत खांडेकर, सौ.डॉ. प्रियदर्शनी देशमुख मॅडम यांनी पौष्टीक तृणधान्य विषयी खूप सखोल माहिती दिली व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण श्री.भास्करराव कोळेकर साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रदर्शन व पाककला स्पर्धेसाठी तालुक्यातील वयक्तिक व बचत गटातील महिला बहूसंख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनाची वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गट, उद्योजक यांच्या मार्फत स्वयंस्पुर्तीने व उत्सपूर्तपणे तृणधान्या पासून तयार केलेल्या पदार्थांचे मोठया प्रमाणात स्टॉल व पदार्थासह उपस्थिती, पाककला स्पर्धेद्वारे तृणधान्याच्या विविध पाक कृतीची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमद्वारे आयोजित स्पर्धेमधून उत्कृष्ठ पाककले साठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांकासह सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले, तसेच सहभागी स्पर्धेकांना उत्तेजनार्थ सन्मान पत्र देण्यात आले.कार्यक्रमास तालुका कृषी कार्यालय, दहिवडी अधिनस्त सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच आत्मा चे BTM व ATM, तालुक्यातील शेतकरी, व शेतकरी बचत गटातील महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्री. संजय बेलदार यांनी केले व मंडल कृषी अधिकारी श्री. जयदीप बनसोडे यांनी आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →