मौजे सोनगाव तालुका जावली जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टीचे आयोजन

मौजे सोनगाव कुडाळ मंडळ ता. जावली जावली जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टी आयोजित श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी व श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री धनंजय सापते कृषी सहाय्यक, श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक ,श्री शांताराम इंगळे कृषी सहाय्यक व श्री पांडुरंग खाडे तसेच गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या उपस्थित शेतकऱ्यांना श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी कृषी सहाय्यक भानुदास चोरगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →