मौजे भिवडी तालुका जावळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टीचे आयोजन

मौजे भिवडी तालुका जावळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टी आयोजित ,श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी व श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री धनंजय साप्ते कृषी सहाय्यक श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक श्री शांताराम इंगळे कृषी सहाय्यक व श्री पांडुरंग खाडे तसेच गावातील सरपंच उपसरपंच व शेतकरी श्री संभाजी दरेकर श्री विनोद दरेकर श्री संजय दरेकर श्री गणेश विधाते श्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते उपस्थित शेतकऱ्यांना श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी कृषी सहाय्यक धनंजय सापते यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →