भूमिगत फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली मौजे कृष्णनगर, ता.इगतपुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी भूमिगत फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली मौजे कृष्णनगर, ता.इगतपुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व व विविध तृणधान्य यांच्यामधील पोषक द्रव्य आणि त्यांचे मानवी आरोग्यातील महत्व,तसेच विविध तृणधान्य नागली, वरई पीक लागवड बाबत व एस आर टी पध्द्तीने भात लागवड बाबत मा.श्री.राजेंद्र निकम,प्रकल्प संचालक आत्मा नाशिक यांनी मागर्दर्शन केले. व कंपनीचे संचालक सदस्य यांनी भगर तयार करून आस्वाद घेण्यात आला, श्री देवराम गवारी व श्री भाऊसाहेब शिंदे यांनी SRT पध्द्तीने केलेल्या भात लागवड बाबत मनोगत सांगितले, तसेच श्री सखहरी जाधव यांनी रेशीम विषयी मनोगत व्यक्त केले, समवेत श्री रावसाहेब पाटील, बीटीम आत्मा कार्यलय नाशिक,श्री.हितेंद्र मोरे, बीटीएम इगतपुरी व श्री विनोद सांगळे कृषि सहाय्यक पडली दे. व कंपनीचे संचालक व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →