आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त भवानवाडी (आशिष गांधी मळा), दहिवडी येथे माण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तृणधान्य पिकांचे महत्व, उत्पादन वाढ, प्रक्रिया प्रचार व प्रसिद्धी. याविषयी शेतकरी प्रशिक्षण आयोजीत

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दहिवडी यांच्या वतीने *आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त आज दिनांक 13/01/2023 रोजी भवानवाडी (आशिष गांधी मळा), दहिवडी येथे माण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तृणधान्य पिकांचे महत्व, उत्पादन वाढ, प्रक्रिया प्रचार व प्रसिद्धी. याविषयी शेतकरी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास मा.सौ.डॉ प्रियदर्शनी देशमुख मॅडम विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र कालवडे व मा.श्री. भूषणकुमार यादगीरवार विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,बोरगाव प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.तालुका कृषी अधिकारी श्री.सुहास रणसिंग साहेब यांनी केले, मा. उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण श्री. भास्कर कोळेकर साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना पौष्टीक तृणधान्याचे महत्व व कृषी विभाग व आत्मा योजनेविषयी माहिती दिली. तसेच प्रगतशील शेतकरी श्री. आशिष गांधी यांनी हुरडा ज्वारी (सुरती) या तृणधान्या विषयी माहिती व महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय बेलदार कृ.स.मार्डी यांनी केले व आभार श्री.डी.बी.शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास श्री.जयदीप बनसोडे म.कृ.अ.म्हसवड, श्री.अधीक चव्हाण म.कृ.अ वर-मलवाडी, आत्माचे BTM/ATM, कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी व तसेच मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.राहूल कर्चे यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →