जिल्हा परिषद शाळा चाटोरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्त तृणधान्य दिन साजरा पूरक आहारात विद्यार्थ्यांना नागलीचे पापड

दिनांक 21/2/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा चाटोरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्त तृणधान्य दिन साजरा
करण्यात आला. सदर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. कृषी सहाय्यक अधिकारी पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्ये ओळख करून दिली. कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक बी .एम. शिंदे साहेब यांनी भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले .
ह्या निमित्ताने पूरक आहारात विद्यार्थ्यांना नागलीचे पापड देण्यात आले व विद्यार्थ्यांनी जेवणाच्या डब्यात आणलेले तृणधान्ये पदार्थांचा सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →